Posts

Showing posts from September, 2017

जसा मी आहे निराधार

जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार, की वाहे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच करू काय, व्हायास शुद्ध हीनोपाय, तुझेच रक्त दे सहाय, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच भ्रांति फार, हावा जगात दुर्निवार, घेरीती संकटे अपार, निवारी, प्रिय कोकरा. आलो तसाच अंधळा, दुःखी, दरिद्री, दुबळा, साठा तुझाच सगळा, पुरीव, प्रिय कोकरा. अशाच तू स्वीकारिशी, क्षमा सप्रेम करिशी, की बोलणे न मोडिशी, देवाच्या प्रिय कोकरा. तुझ्या प्रेमेच जिंकिले, या हृदयास चेचिले, आता मी सर्व सोपिले, तुला, हे प्रिय कोकरा