जसा मी आहे निराधार

जसा मी आहे निराधार,
आलो तसाच दे उद्धार,
की वाहे तुझी रक्तधार,
देवाच्या प्रिय कोकरा.
आलो तसाच करू काय,
व्हायास शुद्ध हीनोपाय,
तुझेच रक्त दे सहाय,
देवाच्या प्रिय कोकरा.
आलो तसाच भ्रांति फार,
हावा जगात दुर्निवार,
घेरीती संकटे अपार,
निवारी, प्रिय कोकरा.
आलो तसाच अंधळा,
दुःखी, दरिद्री, दुबळा,
साठा तुझाच सगळा,
पुरीव, प्रिय कोकरा.
अशाच तू स्वीकारिशी,
क्षमा सप्रेम करिशी,
की बोलणे न मोडिशी,
देवाच्या प्रिय कोकरा.
तुझ्या प्रेमेच जिंकिले,
या हृदयास चेचिले,
आता मी सर्व सोपिले,
तुला, हे प्रिय कोकरा

Comments

  1. This is a beautiful composition. I know who wrote this in English but I wanted to know who translated this in Marathi. Can anyone help me out Pls.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Marathi Song "What a friend we have in Jesus" - कोण मित्र येशुवाणी

Marathi song "Showers of blessings" " - वृष्टि कृपेची"

Marathi song "There is a fountain filled with blood"-"येशुच्या रक्ते भरले"