Marathi song "There's a land that is fairer than day"
अत्यंत प्रकाशित स्थळ
१ दिव्य तेजे प्रकाशीत स्थळ दिसे विश्वासनयने वर;
तेथे आम्हासी वस्ती अढळ प्रभु देईले तो प्रियकर
धृ. अहा ! त्या सुस्थळी पार नाहीच हो विश्रामा,
तेथेहीं सुदिनी भेट होयी प्रियांची आम्हा.
२ तारिलेल्यांची ती गायने तेव्हा गाऊ मंजुळ स्वरे,
नाही कोणाचें तै रडणे, दुख पीडा हे गेले सारे.
३ प्रभू ख्रिस्त अत्यंत प्रेमळ, सर्व सत्सुख जो पुरवी,
जीवनाचा तो पाया सबळ, प्रभुराया स्तवू गौरवी
Comments
Post a Comment