Marathi song "Showers of blessings" " - वृष्टि कृपेची"
१ 'होईल वृष्टी कृपेची'
ईशप्रेमोक्ती असे,
तेणे तुष्टी पुष्टि याची
वृद्धि जगी होतसे
ईशप्रेमोक्ती असे,
तेणे तुष्टी पुष्टि याची
वृद्धि जगी होतसे
धृ. वृष्टि कृपेची ।
वृष्टि कृपेची हवी
बिंदु येताती, दयेची
आम्हा सुवृष्टी हवी
वृष्टि कृपेची हवी
बिंदु येताती, दयेची
आम्हा सुवृष्टी हवी
२ 'होईल वृष्टि कृपेची'.
स्फूर्तिदायी, थोर ती;
ये झोड भारी वारीची,
खिंड्याटेकाडांत ती
स्फूर्तिदायी, थोर ती;
ये झोड भारी वारीची,
खिंड्याटेकाडांत ती
३ 'होईल वृष्टी कृपेची'
देवा, करावी आतां
स्वोक्ति करा स्वामी साची,
द्या हर्ष अपेक्षितां
देवा, करावी आतां
स्वोक्ति करा स्वामी साची,
द्या हर्ष अपेक्षितां
४ 'होईल वृष्टी कृपेची'
साधा प्रभूइष्ट काज,
ऐसी विनंती खिस्ताचे
नावें करितसुं आज
साधा प्रभूइष्ट काज,
ऐसी विनंती खिस्ताचे
नावें करितसुं आज
वि. का. कोशे
Beautiful songs!
ReplyDeleteFavourite song
ReplyDelete