Marathi Song "What a friend we have in Jesus" - कोण मित्र येशुवाणी

                प्रिय मित्र येशू

कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया ?
   सर्व दुःखे तो ऐकूनी, साह्य करि सोसाया;
   त्याकडे कधी न जातां, आम्ही अवमानितो
   शांती खरी हरवुनी, शोक किती करितो |

२ मोह असले कि चिंता, कांहि दिसे त्रासाया,
   धैर्य नच सुटू देतां जा प्रभुला सांगाया
   सर्व दुबळ्यांस पाहे, चित्तवृत्ति जाणतो
   मित्र प्रिय असा आहे,  हात धरी म्हणतो |

३ कष्टि जरी श्रमलेले, खांब जड वाहाया,
   त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया
   मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया
   तोचि सखा स्वर्गाहूनी, सिद्ध अंगीकाराया |

मेरी इ. बिसल

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Marathi song "Showers of blessings" " - वृष्टि कृपेची"

Marathi song "There is a fountain filled with blood"-"येशुच्या रक्ते भरले"