Marathi Song "Blessed Assurance" - धन्य हो धन्य येशु माझा
धन्य हो धन्य येशु माझा,
प्रेमी किती हा दैवी राजा
खंडूनी त्यानें केले मुक्त,
शुद्ध कराया ओतिले रक्त
येशूची प्रीति वर्णूू किती,
नित्य करीन मी त्याची स्तुती ।।धृ.।।
संपूर्ण अर्पण संपूर्ण सुख
होई नित्यानंद पाहातांना मुख
दूत आकाशी दणाणती
येशूची प्रीति ते वदती
संपूर्ण अर्पण त्याच्या पायी
त्रात्यामध्ये मी सुखी राही,
असे तल्लीन मी त्याच्या भक्तित
गेलो बुडून मी त्याच्या प्रीतित.
Comments
Post a Comment