Posts

जसा मी आहे निराधार

जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार, की वाहे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच करू काय, व्हायास शुद्ध हीनोपाय, तुझेच रक्त दे सहाय, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच भ्रांति फार, हावा जगात दुर्निवार, घेरीती संकटे अपार, निवारी, प्रिय कोकरा. आलो तसाच अंधळा, दुःखी, दरिद्री, दुबळा, साठा तुझाच सगळा, पुरीव, प्रिय कोकरा. अशाच तू स्वीकारिशी, क्षमा सप्रेम करिशी, की बोलणे न मोडिशी, देवाच्या प्रिय कोकरा. तुझ्या प्रेमेच जिंकिले, या हृदयास चेचिले, आता मी सर्व सोपिले, तुला, हे प्रिय कोकरा

Marathi Song "Blessed Assurance" - धन्य हो धन्य येशु माझा

धन्य हो धन्य येशु माझा, प्रेमी किती हा दैवी राजा खंडूनी त्यानें केले मुक्त, शुद्ध कराया ओतिले रक्त येशूची प्रीति वर्णूू किती, नित्य करीन मी त्याची स्तुती ।।धृ.।। संपूर्ण ...

Marathi song "There's a land that is fairer than day"

अत्यंत प्रकाशित स्थळ १ दिव्य तेजे प्रकाशीत स्थळ दिसे विश्वासनयने वर;     तेथे आम्हासी वस्ती अढळ प्रभु देईले तो प्रियकर धृ.  अहा ! त्या सुस्थळी पार नाही च हो विश्रामा,       ...

मेहेफिल मसीहा की

मेहेफिल मसीहा की, शान भी मसीहा की ये मेहेफिल सजाने, आये है हम | मसीहा से मिलेंगे, मसीहा से कहेंगे । तेरे गीत गाने, आये है हम ।। कोरस ।। मसा की फराबानी की, उकाबो सी जवानी की शिफा कि अब्जानी की, हमे आरजू । २ मसा से भर जायेंगे, हवामें उड जायेंगे  । तेरे रुहसे भरने आये है हम ।।१।। मसीहा ही सहारा है, मसीहा जाँनसे प्यारा है गुनाहो का कफारा है, जिन्दा खुदा । २ मीठी मीठी  जिंदगी, रुहोंकी ताजगी । नयी ज्योत देने आये है हम ।।२।। नजर है मसीहा पर, फकर है मसीहा पर इमान मसीहा पर, मसीहा तू आ । २ है दिलहन मुंतजर,  नजर अफलाकपर नक्कारे को सूनने आयें है हम ।।३।। मसा : अभिषेक फराबानी : अब्जानी : आरजू : desire/इच्छा कफारा : प्रायश्चित/atonement फकर : अभिमान/proud इमान : विश्वास दिलहन : दुल्हन मुंतजर : इंतजार /to wait anxiously for अफलाक : स्वर्ग/ heaven नक्कारे : drum

Marathi song "There is a fountain filled with blood"-"येशुच्या रक्ते भरले"

१ येशूच्या रक्ते भरलें    धुण्याचे कुंड जाण,    जे पापी त्यांत घातले    ते होती शुद्ध प्राण । २ तो खांबी मरणारा चोर    त्यामुळे हर्षला,   तेणेंचि माझा दोष घोर   पुसेल सगळा । ३ हे प्रभु तुझे रक्तमोल   कधीं न संपणार   देवाचें सर्व प्रिय कूळ   तू तेणे खंडणार । ४ हा रक्त ओघ वाहतां   मी भावें पाहीला,   तेथूनी स्तुति करीता   उद्धार गाईला । ५ मी ह्या जगांत राहतां   करीन स्तवने,   व प्राण अंती सोडिता   अनंत गायनें । एच. बॅलन्टाइन

Marathi song "Sweet hour of prayer"-"भक्तीचि वेळ"

१ भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ    मला सदैव आवडेल,   मी टाकिं चिंता सगळी   व जाई बापाजवळी ;   ती संकटाच्या समयीं   देईल शक्ती हृदयी,   तै मोहपाशही टळेल,   अमोल ती भक्तीचि वेळ । २. भक्ती...

Marathi song "Are you washed in the blood" - "पतिता, ये चल शुचिं व्हायाला"

१ पतिता, ये चल शुचिं व्हायाला, प्रभु येशुपदास धरीं, अधसिंधूमधुनि तारायाला प्रभु येशु कृपाच तरी धु. प्रभुच्या... प्रभुच्या... प्रभुच्या धर वंद्य पदा जगदुद्घारक गुरूराजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा २ प्रभु येशु क्षितीवरि आला या, बघ तोचि समर्थ सखा, अधपाशा झडकरी तोडाया तुज देईल नित्य सुखा ३ म्हणवी तो पतितसखा, देई अधमुक्ति विनम्र जनां म्हणुनी तू शरण तया जाई प्रभु देईल शांति मना ४ मनुजांच्या हरि अवघ्या तापा प्रणतीं करूणा करितो , प्रभुपाशी चल त्यजुनी पापा शरणगततारक तो पंडिता रमाबाई