Marathi song "Sweet hour of prayer"-"भक्तीचि वेळ"
१ भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ
मला सदैव आवडेल,
मी टाकिं चिंता सगळी
व जाई बापाजवळी ;
ती संकटाच्या समयीं
देईल शक्ती हृदयी,
तै मोहपाशही टळेल,
अमोल ती भक्तीचि वेळ ।
२. भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ।
ही गोड कैेशि वर्णवेल?
करी मला ती प्रेरणा,
देव मी, अर्पि प्रार्थना;
त्या ठायिं भाव ठेवुनी
व भार सर्व टाकुनी
कृपा अनंत तै मिळेल
ही धन्य हो भक्तीचि वेळ ।
३. भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ
जिवा आधारही लाभेल;
देहांतुनी सुटूनियां
जाई वरी चढूनियां;
पवित्र होति भावना,
समाप्त सर्व प्रार्थना,
तै जयकार हो गर्जेल;
सफळ ही भक्तीचि वेळ ।
मेरी ई बिसल
Comments
Post a Comment