Posts

Showing posts from 2015

Marathi song "There is a fountain filled with blood"-"येशुच्या रक्ते भरले"

१ येशूच्या रक्ते भरलें    धुण्याचे कुंड जाण,    जे पापी त्यांत घातले    ते होती शुद्ध प्राण । २ तो खांबी मरणारा चोर    त्यामुळे हर्षला,   तेणेंचि माझा दोष घोर   पुसेल सगळा । ३ हे प्रभु तुझे रक्तमोल   कधीं न संपणार   देवाचें सर्व प्रिय कूळ   तू तेणे खंडणार । ४ हा रक्त ओघ वाहतां   मी भावें पाहीला,   तेथूनी स्तुति करीता   उद्धार गाईला । ५ मी ह्या जगांत राहतां   करीन स्तवने,   व प्राण अंती सोडिता   अनंत गायनें । एच. बॅलन्टाइन

Marathi song "Sweet hour of prayer"-"भक्तीचि वेळ"

१ भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ    मला सदैव आवडेल,   मी टाकिं चिंता सगळी   व जाई बापाजवळी ;   ती संकटाच्या समयीं   देईल शक्ती हृदयी,   तै मोहपाशही टळेल,   अमोल ती भक्तीचि वेळ । २. भक्ती...

Marathi song "Are you washed in the blood" - "पतिता, ये चल शुचिं व्हायाला"

१ पतिता, ये चल शुचिं व्हायाला, प्रभु येशुपदास धरीं, अधसिंधूमधुनि तारायाला प्रभु येशु कृपाच तरी धु. प्रभुच्या... प्रभुच्या... प्रभुच्या धर वंद्य पदा जगदुद्घारक गुरूराजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा २ प्रभु येशु क्षितीवरि आला या, बघ तोचि समर्थ सखा, अधपाशा झडकरी तोडाया तुज देईल नित्य सुखा ३ म्हणवी तो पतितसखा, देई अधमुक्ति विनम्र जनां म्हणुनी तू शरण तया जाई प्रभु देईल शांति मना ४ मनुजांच्या हरि अवघ्या तापा प्रणतीं करूणा करितो , प्रभुपाशी चल त्यजुनी पापा शरणगततारक तो पंडिता रमाबाई

Marathi song "Bringing in the sheaves" -"पेंढ्या घेऊनी"

पेरा हो सकाळी पेरा प्रीतिबीज दुपारीही पेरा संध्याकाळी हो कापणी निश्चये पीक प्राप्त होई आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेऊनी धृ. पेंढ्या घेऊनी पेंढ्या घेऊनी आम्ही हर्षे येऊ प...

Marathi Song "What a friend we have in Jesus" - कोण मित्र येशुवाणी

                प्रिय मित्र ये शू १ कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया ?    सर्व दुःखे तो ऐकूनी, साह्य करि सोसाया;    त्याकडे कधी न जातां, आम्ही अवमानितो    शांती खरी हरवुनी, शोक किती करितो | २ मोह असले कि चिंता, कांहि दिसे त्रा साया,    धैर्य नच सुटू देतां जा प्र भुला सांगा या    सर्व दुबळ्यांस पाहे, चित्तवृत्ति जाणतो    मित्र प्रिय असा आहे ,   हात धरी म्हणतो | ३ कष्टि जरी श्रमलेले, खांब जड वाहाया,    त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया    मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया    तोचि सखा स्वर्गाहूनी, सिद्ध अंगीकाराया | मेरी इ. बिसल

Marathi song "Showers of blessings" " - वृष्टि कृपेची"

१ 'होईल वृष्टी कृपेची'     ईशप्रेमोक्ती असे,     तेणे तुष्टी पुष्टि याची     वृद्धि जगी होतसे धृ. वृष्टि कृपेची ।     वृष्टि कृपेची हवी     बिंदु येताती, दयेची     आम्हा सुवृष्टी हवी २ 'होईल वृष्टि कृपेची'.     स्फूर्तिदायी, थोर ती;     ये झोड भारी वारीची,     खिंड्याटेकाडांत ती ३ 'होईल वृष्टी कृपेची'   देवा, करावी आतां   स्वोक्ति करा स्वामी साची,   द्या हर्ष अपेक्षितां ४ 'होईल वृष्टी कृपेची'    साधा प्रभूइष्ट काज,    ऐसी विनंती खिस्ताचे    नावें करितसुं आज वि. का. कोशे