Marathi song "Bringing in the sheaves" -"पेंढ्या घेऊनी"
पेरा हो सकाळी पेरा प्रीतिबीज
दुपारीही पेरा संध्याकाळी हो
कापणी निश्चये पीक प्राप्त होई
आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेऊनी
धृ. पेंढ्या घेऊनी पेंढ्या घेऊनी
आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेऊनी.
सूर्याच्या तेजाने साऊली ही पेरा
मोठा वारा सुटे अभ्रे पळती
कापणी निश्चये फ़ळ मिळे कष्टाचे
आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेऊनी.
स्वामीसाठी पेरा अश्रु ढाळतांना
दुःख असो भारी मन कष्टती
प्रभु अंगीकारी अश्रु पुसूनिया
आम्ही हर्षे येऊ पेंढ्या घेऊनी.
Comments
Post a Comment