Marathi Song "What a friend we have in Jesus" - कोण मित्र येशुवाणी
प्रिय मित्र येशू
१ कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया ?
सर्व दुःखे तो ऐकूनी, साह्य करि सोसाया;
त्याकडे कधी न जातां, आम्ही अवमानितो
शांती खरी हरवुनी, शोक किती करितो |
सर्व दुःखे तो ऐकूनी, साह्य करि सोसाया;
त्याकडे कधी न जातां, आम्ही अवमानितो
शांती खरी हरवुनी, शोक किती करितो |
२ मोह असले कि चिंता, कांहि दिसे त्रासाया,
धैर्य नच सुटू देतां जा प्रभुला सांगाया
सर्व दुबळ्यांस पाहे, चित्तवृत्ति जाणतो
मित्र प्रिय असा आहे, हात धरी म्हणतो |
धैर्य नच सुटू देतां जा प्रभुला सांगाया
सर्व दुबळ्यांस पाहे, चित्तवृत्ति जाणतो
मित्र प्रिय असा आहे, हात धरी म्हणतो |
३ कष्टि जरी श्रमलेले, खांब जड वाहाया,
त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया
मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया
तोचि सखा स्वर्गाहूनी, सिद्ध अंगीकाराया |
त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया
मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया
तोचि सखा स्वर्गाहूनी, सिद्ध अंगीकाराया |
मेरी इ. बिसल
Love this song💓❤💓
ReplyDelete