Marathi song "Are you washed in the blood" - "पतिता, ये चल शुचिं व्हायाला"
१ पतिता, ये चल शुचिं व्हायाला,
प्रभु येशुपदास धरीं,
अधसिंधूमधुनि तारायाला
प्रभु येशु कृपाच तरी
प्रभु येशुपदास धरीं,
अधसिंधूमधुनि तारायाला
प्रभु येशु कृपाच तरी
धु. प्रभुच्या... प्रभुच्या...
प्रभुच्या धर वंद्य पदा
जगदुद्घारक गुरूराजाच्या
न दुजा पथ मुक्तिपदा
प्रभुच्या धर वंद्य पदा
जगदुद्घारक गुरूराजाच्या
न दुजा पथ मुक्तिपदा
२ प्रभु येशु क्षितीवरि आला या,
बघ तोचि समर्थ सखा,
अधपाशा झडकरी तोडाया
तुज देईल नित्य सुखा
बघ तोचि समर्थ सखा,
अधपाशा झडकरी तोडाया
तुज देईल नित्य सुखा
३ म्हणवी तो पतितसखा,
देई अधमुक्ति विनम्र जनां
म्हणुनी तू शरण तया जाई
प्रभु देईल शांति मना
देई अधमुक्ति विनम्र जनां
म्हणुनी तू शरण तया जाई
प्रभु देईल शांति मना
४ मनुजांच्या हरि अवघ्या तापा
प्रणतीं करूणा करितो ,
प्रभुपाशी चल त्यजुनी पापा
शरणगततारक तो
प्रणतीं करूणा करितो ,
प्रभुपाशी चल त्यजुनी पापा
शरणगततारक तो
पंडिता रमाबाई
Very good
ReplyDelete